Monday 2 July 2012

न्यु बिमा गोल्ड : मनी बॅक पॉलिसी

माझ्या सहकार्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक करण्याबद्दल विचार व्यक्त केला. त्यांनी ही  गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये रिकरिंग प्रकारामध्ये करू असे ठरवले. पोस्ट ऑफिस व बँक मधील रिकरिंग हे 1 ते 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करण्यासाठी सांगतात. त्यांच्या ह्या विचारावर मी त्यांना LIC (Insurance) बद्दल माहिती दिली. ज्या मध्ये गुंतवणूक केल्यावर आपणास योग्य तो परतावा मिळतोच त्याशिवाय आपल्या जीवाच्या जोखमीबद्दल विमाही मिळतो. ज्यामुळे आपल्या पश्चात आपल्या मुलास योग्य रकमेचा परतावा मिळू शकतो.

 न्यू बीमा  गोल्ड ह्या प्लान बद्दल माहिती त्यांना मी दिली ती खालील प्रमाणे :
हि नफ्यासह मनी बॅक योजनेसारखीच एक अनुपम योजना आहे. जिच्यात  पॉलिसी मुदती दरम्यानच्या देय प्रिमियामांना हप्त्यांच्या स्वरूपात परत केले जाईल. जर पॉंलीसीधारक पॉलिसी अवधीदरम्यान हयात असेल तर त्याला या प्रिमियामांना उल्लेखित कालावाधींमध्ये वापस केले जाईल.जीवन सुरक्षा केवळ पॉंलिसी अवधी दरम्यानच नव्हे तर पॉंलिसीच्या विस्तारित अवधी दरम्यानपण उपलब्ध होईल.

विस्तारित अवधी (Extended Term) म्हणजे काय ?
या योजनेला विस्तारित अवधीची सुविधा उपलब्ध आहे. हि अवधी पॉंलिसी अवधीच्या निम्मी असेल, व पॉंलिसी अवधीच्या समाप्तीनंतर तिचा प्रारंभ होईल. उदा. 20 वर्षे पॉंलिसी अवधीसाठी विस्तारीत अवधी 10 वर्षाची असेल. अर्थात एकूण अवधी 30 वर्षे असेल. विस्तारित अवधीचे वेशिष्ट्य हे कि या अवधीदरम्यान प्रिमियम द्यावे लागत नाहीत.

मृत्यू लाभ
(अ) पॉंलिसी अवधी दरम्यान मृत्यूप्रसंगी मूळ विमा रक्कम नॉंमिनीला दिली जाईल.
(ब) पॉंलिसीच्या विस्तारित अवधी दरम्यान मृत्यूप्रसंगी मूळ विमा रकमेचा 50% देय होईल पण आत हि कि पॉंलीसिशी निगडीत सर्व प्रीमियम व्यवस्थित दिले गेले पाहिजेत.

सर्व्हायवल बेनिफिट (SB) : जर पॉंलिसीधारक पॉंलिसिच्या उल्लेखित कालावधींच्या अखेरीपर्यंत ह्यात राहिल्यास त्याला खालील प्रमाणे लाभ प्राप्त होतील  (मूळ  विमा रक्कमेच्या)

                                                          पॉंलिसी वर्षाअंती प्राप्त रक्कम(मूळ  विमा रक्कमेच्या %)
                          पॉंलिसी अवधी             4th                8th             12th                16th
                          12 वर्षे                           15%             15%              ---                 ---
                          16 वर्षे                           15%             15%              15%              ---
                          20 वर्षे                           10%             10%              10%              10%

परिपक्वता लाभ : पॉंलिसी अवधीदरम्यान दिलेल्या प्रीमियामांच्या एकूण रकमेतून SB  ना वजा करून शिल्लक रक्कम, Loyalty Addition (जर कुठला असेल तर) देय होईल.

दुर्घटना लाभ : जर याचा विकल्प घेतला असल्यास व विमित जीवनाचा मृत्यू दुर्घटनेमध्ये झाल्यास मूळ  विमा रकमेसह दुर्घटना लाभ विमा रक्कम पण देय होईल. पण हो विकल्प केवळ पॉंलिसी  अवधी दरम्यान लागू होईल. पॉंलिसीच्या विस्तारित अवधी दरम्यान नव्हे.

ऑटो कव्हर : जर कमीत कमी दोन वर्षांसाठी प्रीमियम दिले गेले असतील परंतु त्यानंतर प्रीमियम न दिले गेले तरी, प्रथम प्रीमियम न देण्याच्या तारखे पासून दोन वर्षांपर्यंत पूर्ण मृत्यू सुरक्षा कायम राहील.

उदाहरण : 35 वर्षीय श्री. हेमंत 20 वर्षांसाठी 2 लाख रु विमा रकमेची पॉंलिसी घेतात. याखेरीज ते 2 लाख रु साठी दुर्घटना लाभ रायडरचाही विकल्प घेतात. ते 8020 रु वार्षिक प्रीमियम देतात. ते ह्यात राहिल्यास, दर 4थ्या, 8 व्या, 12 व्या, व 16 व्या या पॉंलिसी वर्षांअंती त्यांना 20,000 रु (विमा रक्कमेचा 20%). अर्थात एकूण 80,000 रु S.B. च्या स्वरूपात प्राप्त होतील.
परिपक्वतेवर, अर्थात 20 व्या पॉंलीसि वर्षांअंती त्यांना 76,400 रु (20 वर्षांसाठी देय प्रीमियमच्या एकूण रकमेतून 8020 x 20 = 160400 रु) पूर्वदेय S.B. ना (80000 रु) व दुर्घटना  लाभ रायडरसाठी दिलेल्या प्रीमियम (4000 रु) वजा करून बाकी रक्कम + Loyalty Addition जर असेल तर, प्राप्त होईल.
जर श्री. हेमंतचा मृत्यू, 17 व्या पॉंलिसी वर्षादरम्यान झाल्यास (अ) नैसर्गिक मृत्यूप्रसंगी, त्यांचा नॉंमिनीला 2 लाख रु मिळतील (ब) दुर्घटनेत मृत्यू झाल्यास नॉंमिनीला 4 लाख रु प्राप्त होतील.
दोन्ही बाबतीत, वरील प्राप्त लाभ, आधीच मिळालेल्या S.B. च्या अतिरिक्त असतील.
जर श्री. हेमंतचा मृत्यू, पॉंलिसीच्या विस्तारित अवधी दरम्यान नैसर्गिक वा दुर्घटनेत होतो तर नॉंमिनीला विमा रकमेच्या 50% अर्थात 1 लाख रु प्राप्त होतील.

No comments:

Post a Comment