Thursday, 19 April 2012

जोखमीचे वर्गीकरण

जोखमीचे वर्गीकरण 
व्यक्तीच्या आयुष्यावरील जोखमीवर परिणाम करणाऱ्या घटकास धोका सूचक म्हटले जाते. 
धोकासुचके (अ) शारीरिक (ब) व्यावसायिक किंवा (क) नैतिक असू शकतात.

शारीरिक धोका सुचके  अशी आहेत :-
(अ) वय : जसजसे वय वाढते तसतशी मृत्यूची संभाव्यता वाढते. ह्या संभाव्यतावर आधारित मृत्युदर तालिका तयार केल्या जातात. त्यापासून विम्याच्या हप्त्याची दर कोष्टके तयार करतात.
(ब) लिंग : तरुण वयात स्त्री व्यक्तीचा मृत्युदर तरुण पुरुष व्यक्तीपेक्षा जास्त असतो. विशेषत: निम्नस्तर आणि अशिक्षित गटात हे प्रमाण जास्त आढळते. प्रसुतीजन्य काळजी पुरेशी न घेतली जाणे हे एक कारण असू शकेल. स्त्री व्यक्तीच्या बाबतीत विमाकनिया आवश्यकता ह्या भिन्न असतात.
(क) बांधा : ह्यामध्ये उंची, वजन, छाती आणि पोट ह्यांचा घेर ह्यामुळे हृदयवाहिनिजन्य आणि अन्य व्याधी उदा. मधुमेह किंवा क्षय यांचा निर्देश होऊ शकतो. मानक वजनापासून असलेला फरक हाही विमांककाचे लक्ष वेधून घेतो.
(ख) शारीरिक स्थिती : प्रतिक्षिप्त क्रिया (उदा. गुडघ्याचे स्नायु डोळ्याच्या पापण्या), रक्त दाब, नदीचे ठोके, मूत्र वगैरे ह्या संबंधातील माहिती ह्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या यंत्रणांच्या स्थितीचे ज्ञान होते.
(ग) शारीरिक व्यंगे - अंधत्व, बहिरेपण वगैरे आणि अन्य अवस्था ज्यांची गणना आजारपणात होत नाही पण ज्यांचा मृत्यू संभाव्यतेवर परिणाम होतो अशी धोका सुचके.
(घ) वैयक्तिक इतिहास : व्यक्तीच्या तब्येतीविषयी आणि जीवनपद्धती ह्या विषयी महत्वाची माहिती ह्यातून मिळते.
(च) कौटुंबिक इतिहास : व्यक्तीस आजारपणास तोंड द्यावी लागण्याची शक्यता जी वंशपारंपारिक घटकांच्यामुळे उदभवू शकते, अशांचा अभ्यास इथे होतो. अकाली मृत्यू, ह्र्दयशिरोजन्य रोग, मधुमेह यांचा कौटुंबिक इतिहास हे महत्वाचे ठरतात.


व्यावसायिक धोकासुचके :
ही व्यावसायजन्य असतात. कामाचे स्वरूप आणि कामाच्या जागेचे स्वरूप ह्यांचा कामगारावर परिणाम होतो.

नैतिक धोकासुचके :
नैतिक धोकासुचके प्रस्तावकाच्या हेतुंशी संबंधीत असतात. विम्याची खरीखुरी निकड असल्याने प्रस्ताव सादर करण्यात आला असेल तर नैतिक धोका नाही. नैतिक धोक्याचे मोजमाप करता येत नाही. ते सिद्ध करण्यासाठी परीक्षा नाही. ते केवळ एक मत असते.
पुढील परिस्थतीत नैतिक धोका आहे अशी शंका घेता येईल :
(अ) वयस्कर प्रस्तावक, आतापर्यत विमा घेतलेला नाही आणि प्रस्तावित विमा रक्कम मोठी आहे.
(ब) उत्पन्नाच्या   तुलनेत विमा रक्कम जास्त आहे.
(क) कुटुंब सदस्याच्या नावावर मोठी विमा रक्कम प्रस्तावित आहे, पण मिळवते सदस्य विमित नाहीत किंवा तुलनेने फारच कमी रकमेचा विमा त्यांनी उतरवलेला आहे.
(ख)  वैद्यकीय परीक्षा नेहमीच्या राहण्याच्या ठिकाणी झालेली नाही.

 

No comments:

Post a Comment