Thursday, 26 April 2012

आयुर्विम्याचे फायदे

आयुर्विम्याचे फायदे 
आयुर्विम्याला कोणत्याही व्यवसायापासून स्पर्धा नाही. आयुर्विमा हि गुंतवणूक किंवा बचतीचे साधन आहे असे अनेकांना वाटते हा दृष्टीकोन योग्य नाही. एखादी व्यक्ती जेव्हा बचत करते तेव्हा कोणत्याही वेळी उपलब्ध असणारा निधी हा बचत केलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज इतका असतो. बँकेतील मुदत ठेव, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सहयोग निधी आणि अन्य बचतीचे पर्याय ह्यांच्याबाबतीत हे खरे आहे. जर शेअर्स आणि स्टॉक ह्यांच्यात गुंतवणूक केली तर स्टॉक मार्केट मधील चढ उतारात ही गुंतवणूक नाहीशी होण्याचा धोका असतो जरी तोटा झाला नाही तरी कोणत्याही वेळी उपलब्ध असलेली रक्कम म्हणजे गुंतवणूक केलेली रक्कम अधिक त्यावरील मुल्यवाढ एवढीच असेल आयुर्विम्यात मात्र उपलब्ध असलेला निधी म्हणजे आतापर्यत केलेल्या बचतीचे संकलन (भरलेले हप्ते) नव्हे तर बचतीच्या एकूण कालावधी अखेर (पुढील २० ते ३० वर्षे) आपल्यास इच्छित असलेली रक्कम, अंतिम निधी हा प्रारंभ पासून निश्चत केला जातो. बचतीच्याव्दारा ह्या निधीसाठी नंतर किंमत मोजली जाते.
आपण हयात असू तोपर्यंत किंवा आपल्या निवडीनुसार त्याहून कमी कालावधीसाठी ही किंमत मोजावी लागते. आश्वासित निधीवर ह्याचा परिणाम होत नाही. अशातर्हेचा लाभ देणारी अन्य कोणतीही योजना नाही. म्हणूनच आयुर्विम्याला पर्याय नाही असे म्हटले जाते.

भाडे तत्वावर खरेदी योजनेसारखी ही योजना नाही. ह्या योजनेत इच्छित खरेदी लगेच होते. पण खरेदीची किंमत ही हप्त्या-हप्त्याने दिली जाते. मात्र खरेदीदाराचा मृत्यू ओढवल्यास उर्वरित हप्ते माफ होत नाहीत. हयात असलेल्या कुटुंबीयांनी ते फेडायला हवेत. आयुर्विम्याच्या बाबतीत मृत्युनंतर हप्ते भरणे बंद होते. बाकी हप्ते भरावे लागत नाहीत. आयुर्विम्याचा लाभांची बरोबरी करील अशी कोणतीही अन्य वित्तीय व्यवस्था नाही.

बचतीच्या अन्य योजनांशी तुलना करता आयुर्विम्याचे पुढील प्रमाणे लाभ दृष्टोत्पत्तीस येतात :
  • मृत्यू ओढवल्यास दावा वाटप सोपे असते. वारसांना रक्कम लवकर मिळू शकते कारण नामांकन -समनुदेशन  ह्यांची सोय असते. नामांकनाची सोय आता बँक खात्यावरही / भविष्य निर्वाह निधीवरही असते.
  • बचत योजना पार पाडण्याची थोडीशी सक्तीही असते. अन्य प्रकारात जर बचतीची मूळ योजना बदलली तर नुकसान होत नाही. विमा प्रकारात मात्र नुकसान होते.
  • धनकोंना पॉलिसी रक्कमेवर हक्क सांगता येत नाही. न्यायालयाच्या प्रतिबंधक आदेशापासून त्यास वाचवता येते.
  • कर लाभ मिळतात - आयकर आणि भांडवली लाभ दोहोबाबतीत.
  • विक्रीसुलभता आणि रोखीकरण सुलभता चांगल्या असतात. आयुर्विमा पॉलिसी ही मालमत्ता आही. तिचे हस्तांतरण किंवा गहाणवट होऊ शकते. पॉलिसीवर ऋण / कर्ज घेता येते.   

No comments:

Post a Comment