Saturday 25 August 2012

आपला ग्राहक ओळखा (KYC)

आपला ग्राहक  ओळखा (KYC)

Anti Money Laundering Programme (AML) अंतर्गत IRDA ने विमाकर्तासाठी काही निर्देशिका जारी केल्या आहेत ज्याने  संशयास्पद व्यवहारांना अधिकृत अधिकाऱ्यासमक्ष आणता यावे.

आपला ग्राहक ओळखा (KYC) चे नियम AML निर्देशिकांचा आवश्यक व महत्वपूर्ण हिस्सा आहे. हे केल्याने विमा उत्पादनाच्या विक्रीस, ग्राहकांना परखण्यास, रिकॉर्डच्या देखभालीत व विमा प्रस्तावांच्या स्वीकृती व अन्य प्रक्रियांत सहायता होईल.

आपला ग्राहक ओळखाच्या संक्षिप्त गाईडलाईन्स खालीलप्रमाणे आहेत.
  • सर्व प्रस्तावांसाठी व्यक्तीचे ओळखपत्र व त्याच्या घरच्या पत्त्याचा दस्तऐवज असणे अनिवार्य. या दस्तएवजांना प्रस्तावाचा महत्वपूर्ण हिस्सा मानून प्रस्तवासाहित  संलग्न केले जाईल.
  • वार्षिक प्रीमियम १ लाख व त्याहून जास्ती असणाऱ्या  सर्व प्रस्तावांबाबतीत उत्पन्नाचे प्रमाण अनिवार्यपणे प्राप्त करायला हवे. बँक खात्याच्या विवरणाचा आग्रह केला जाऊ शकतो.
  • ज्यांचा वार्षिक प्रीमियम एक  लाखाहून कमी आहे अशा सर्व प्रस्तावांवर प्रचलित विमा अंडररायटिंग नियमांनुसार निर्णय घेतला जाईल. तरीही, बँक खात्याच्या विवरणाच्या प्रस्तुतीवर बळ दिले जाऊ शकते.
ग्राहकांची ओळख प्रक्रिया 

कायदेशीर नाव व अन्य कुठले नाव  असल्यास आवश्यक दस्तऐवज :
  1. पासपोर्ट 
  2. पॅन कार्ड 
  3. मतदार ओळखपत्र 
  4. ड्राइविंग लाईसेन्स 
राहण्याच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक दस्तऐवज 
  1. टेलिफोन बिल 
  2. बँक खात्याचे विवरण 
  3. एखाद्या मान्यताप्राप्त सरकारी अधिकाऱ्याचे पत्र 
  4. वीज बिल 
  5. रेशन कार्ड 
उत्पन्नाचे प्रमाण 
  1. आयकर निर्धारण आदेश / आयकर विवरण 
  2. मालकाचे प्रमाणपत्र 
  3. चार्टर्ड  अकाउंटंटचे प्रमाणपत्र 
  4. कृषीय उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  5. कृषी भूमीचे विवरण व उत्पन्नाचे निर्धारण 
  6. बँक व्यवहाराच्या विवारणी, पास बुक 

No comments:

Post a Comment