जीवन अंकुर

 जीवन अंकुर 
(कोष्टक नं. 807)
आपल्या लहानग्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय

योजनेची ठळक वैशिष्टे 
  • सर्व पालकांनी आवर्जून गुंतवणूक करावी, अशी अत्यंत आकर्षक योजना.
  • पालकांच्या जीवितावर विमा उतरविला जाईल, तर मुलगा / मुलगी लाभधारक असतील.
  • नुकत्याच जन्मलेल्या मुला/मुलीसाठी सुध्दा योजनेचा लाभ घेता येईल.
  • हि योजना पारंपारिक नफ्यासहित योजना आहे.
  • 18 ते 50 वयोगटातील पालक, ज्यांना शून्य ते 17 वर्षे वयापर्यंतचे मुलगा / मुलगी असतील, अशांसाठी आदर्श योजना.
  • गरजे नुसार मुदत निवडण्याची मुभा.
मिळणारे लाभ 
  • मुदतपूर्ती लाभ : पॉलिसी पूर्व निर्धारित मुदत संपतेवेळी, विमित व्यक्ती (पालक) जिवंत असल्यास, मुळ विमा रक्कम, निष्ठा लाभ (लागू असल्यास) यासह दिली जाईल.
  • मृत्यू लाभ : पॉलिसी मुदतीत विमित व्यक्तीचा (पालकाचा) मृत्यू झाल्यास मूळ विमा रक्कम त्वरित दिली जाईल, मृत्युच्या तारखेची सुसंगत अथवा त्यानंतर लगेचच्या पॉलिसी वर्षदिनापासून मुदत संपेपर्यंत  दरवर्षी मूळ  विमा रक्कमेच्या 10% रक्कम "उत्पन्न  लाभ (Income Benefit)" म्हणून दिली जाईल.
  • याशिवाय मुदतपूर्तीच्या वेळी पुन्हा एकदा मूळ  विमा रक्कम + निष्ठा लाभ दिला जाईल.
  • अपघाती लाभ, गंभीर आजार संरक्षण लाभ व हप्ते माफीचा लाभ पर्यायी स्वरूपात उपलब्ध.

2 comments:

  1. tumhi jivan ankur chi changali mahiti dilit.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks if you give your family & email id details then i will give you more information about this plan.

      give your age, if married husband age & child age

      thanks again..

      Delete